नाशिक : म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत घरफोड्या करणा-या पाच जणांच्या टोळक्यास पोलीसांनी जेरबंद केले असून त्यांच्या ताब्यातून सोन्याच्या लगडसह दोन एलईडी टिव्ही जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली.
अजय विठ्ठल घोडके (२५ रा.मातोश्री नर्सरी, महिरावणी त्र्यंबकरोड),चेतन जयराम जाधव (२० रा.मानकरमळा,स्वामी विवेकानंद नगर म.बाद),रवी विठ्ठल घोडके (२७ रा.शिवाजीनगर,सिन्नर),भुषण उर्फ सोनू ज्ञानेश्वर पिंगळे (२० रा.नवनाथनगर,पेठरोड) व गोरख नागू आहिरे (१९ रा.पिंगळे गल्ली,मखमलाबाद) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीत चोरट्यांची नावे आहेत.
स्वामी विवेकानंद नगर येथील पाण्याच्या टाकी भागात घरफोडी करणारे चोरटे येणार असल्याची माहिती युनिट १ चे पोलीस नाईक शांताराम महाले यांना मिळाली होती. त्यानुसार गेल्या शुक्रवारी (दि.१२) सापळा लावण्यात आला होता. या सापळयात अजय घोडके,चेतन जाधव आणि विठ्ठल घोडके आदी संशयीत पोलीसांच्या हाती लागले.
पोलीस तपासात त्यांनी उर्वरीत दोन संशयीत साथीदारांच्या मदतीने म्हसरूळ हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानुसार भुषण पिंगळे आणि गोरख आहिरे यास ताब्यात घेतले असता या टोळीचा भांडाफोड झाला. भुषण पिंगळे याच्या ताब्यातून एका घरफोडीतील ७२ हजार रूपये किमतीची सोन्याची लगड जप्त करण्यात आली. तर गोरख अहिरे याने वरिल साथीदारांच्या मदतीने केलेल्या शहरातील एका घरफोडीतील सुमारे ३० हजार रूपये किमतीचे दोन एलईडी टिव्ही काढून दिले.
पोलीस तपासात गोरख आहिरे याने अजय व रवी घोडके यांच्यासमवेत मखमलाबाद शिवारातील रो हाऊस फोडून टिव्ही,हंडा आणि पितळी समई चोरल्याची कबुली दिल्याने संशयीतांच्या ताब्यातून १ लाख ३० हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संशयीतांच्या अटकेने म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील दोन गुन्हे उघडकीस आले.
ही कारवाई युनिटचे निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी,रघुनाथ शेगर,दिनेश खैरणार उपनिरीक्षक निवृत्ती सरोदे,पोलीस अंमलदार काळू बेडकुळे,विजय गवांदे,रविंद्र बागुल,वसंत पांडव,अनिल दिघोळे,संजय मुळक,येवाजी महाले,प्रविण कोकाटे,विशाल काठे,आसिफ तांबोळी,शांताराम महाले,प्रविण वाघमारे,रावजी मगर,फय्याज सय्यद,मोतीराम चव्हाण,मनोज डोंगरे,राजेश लोखंडे,संतोष कोरडे,योगीराज गायकवाड,विशाल देवरे,निलेश भोईर,राहूल पालखेडे,प्रविण चव्हाण,मुक्तार शेख,गौरव खांडरे,राम बर्डे,गणेश वडजे,समाधान पवार व प्रतिभा पोखरकर आदींच्या पथकाने केली.