नाशिक – घरगुती स्वरूपातील उद्योगाबरोबरच कर सल्लागार, वकील, डॉक्टर, सीए, वास्तुविशारद यांना निवासी दराने घरपट्टी आकारण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या महासभेने मंजुरी दिली आहे. नाशिक महानगर पाालिकेची महासभा महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी संपन्न झाली. या महासभेत हा निर्णय घेण्यात आला. सर्वाच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयाचा आधार घेऊन करविभागाने महासभेवर निवासी दराने घरपट्टी आकारण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर याला मंजुरी देण्यात आली.