घडणावळसाठी गेलेल्या महिलेचे दीड लाखाचे दागिणे चोरट्याने केेल लंपास
नाशिक : सराफ दुकानात घडणावळ साठी बसलेल्या ग्राहक महिलेचे दागिणे शेजारी बसलेल्या भामट्या महिलेने चोरून नेल्याची घटना सातपूर येथे घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात चोरीची गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रमिला भीमसिंग राजपूत (रा. पवार संकुल,अशोकनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. प्रमिला राजपूत या बुधवारी (दि.२३) दुपारच्या सुमारास सातपूर गावातील दंडगव्हाळ या सराफ दुकानात गेल्या होत्या. सूनेसाठी जुने सोने मोडून नव्याने राणीहार बनविण्यासाठी त्या गेल्या असता ही घटना घडली. पेढीत गर्दी असल्याने त्या दुकानातील सोफ्यावर बसल्या असता शेजारी बसलेल्या अनोळखी महिलेने त्यांची नजर चुकवून पिशवीतील पर्स हातोहात लांबविली. या पर्समध्ये सुमारे दीड लाख रूपये किमतीचे जुने अलंकार होते. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मजगर करीत आहेत.
…..
बापलेकास सराईतांकडून मारहाण
नाशिक : मेडिकल स्टोअर्स येथे गोळया औषध घेण्यासाठी जाणा-या बापलेकास पोलीस रेकॉर्डवरील त्रिकुटाने मारहाण केल्याची घटना गंगापूर गावात घडली. परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी संशयीत टोळक्याने ही मारहाण केल्याची बोलले जात असून, याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन बाळू फसाळे (रा.गोवर्धनगाव),गणेश राजेंद्र जाधव (रा.शिवाजीनगर) व सोमनाथ उर्फ सनी रघुनाथ झांजर (रा.गोदावरीनगर,गंगापूररोड) अशी बापलेकास मारहाण करणा-या टोळक्याचे नाव आहेत. याप्रकरणी राहूल प्रकाश वाघमारे (रा.आम्रपाली समाज मंदिरा शेजारी,गंगापूरगाव) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. राहूल वाघमारे मंगळवारी (दि.२२) रात्री गंगापूर गावातील सई हॉस्पिटल येथेील मेडिकल स्टोअर्स येथे आजारी आई साठी गोळय़ा औषधे घेण्यासाठी जात असतांना ही घनटा घडली. जिजामाता गार्डन भागात उभ्या असलेल्या टोळक्याने कुठलेही कारण नसतांना परिसरात दहशत पसरविण्यासाठी वाघमारे यास शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी त्याचे वडिल मुलाच्या बचावासाठी धावून आले असता त्यांना एकाने दगड मारून जखमी केले. यावेळी बापलेकास यापूढे वस्तीत दिसला तर हातपाय तोडू अशी धमकी दिली. अधिक तपास पोलीस नाईक पवार करीत आहेत.
…..
अपघातात दुचाकीस्वार ठार
नाशिक : भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत वृध्द दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात महामार्गावरील जकात नाका भागातील ट्रक टर्मिनस येथे झाला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर रेवजी पगारे (६१ रा.पिंपळद ता.निफाड) असे अपघातात ठार झालेल्या वृध्द दुचाकीस्वाराचे नाव आहे. पगारे रविवारी (दि.२०) सायंकाळच्या सुमारास ओझर कडून नाशिकच्या दिशने आपल्या दुचाकीवर (एमएच १५ ईझेड १०५३) प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. महामार्गाने प्रवास करीत असतांना आडगाव जकात नाका परिसरातील ट्रक टर्मिनस समोर पाठीमागून भरधाव येणा-या अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिली. या अपघातात पगारे गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी मुलगा सुभाष पगारे यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहनचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.
…….
महिलेची मंगळसुत्र खेचले
नाशिक : भाजीपाला खरेदी करून घराकडे परतणा-या मायलेकींपैकी एकाच्या गळयातील सोन्याचे मंगळसुत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना अशोका मार्ग भागात घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिनीक्षी विजय साळूंखे (रा.श्रीजी प्राईड,अशोकामार्ग) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. साळूंखे या बुधवारी (दि.२३) सायंकाळच्या सुमारास आपल्या मुलीस सोबत घेवून परिसरात भाजीबाजारात खरेदी साठी गेल्या होत्या. भाजीपाला खरेदी करून दोन्ही मायलेकी मारूती सुझूकी शो रूम समोरून पायी जात असतांना पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या गळय़ातील सुमारे ६० हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र ओरबाडून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक अंकुश जाधव करीत आहेत.