नाशिक – गोविंदनगर परिसरात उड्डाणपुलावर पाच अवजड ट्रक एकमेकांवर आदळल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण जखमी झाले. मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले. त्यांनी ट्रकच्या कॅबीनमध्ये अडकलेल्या चालक-वाहकाला दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर सुरक्षितरीत्या बाहेर काढले. या दुर्घटनेत ट्रकचालक करण जमरे, क्लिनर कृष्णा कन्नोजे हे जखमी झाले आहे. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
असा घडला भीषण अपघात
मुंबईकहून नाशिकच्या दिशेने येणार ट्रक गोविंदनगरजवळ उड्डाणपुलावर नादुरुस्त झाल्यानंतर चालकाने तातडीने आपला ट्रक स्त्यालगत उभा करुन दुरुस्तीचे काम सुरु केले. याचवेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रकचालकाचा ताबा सुटला व येथूनच या भीषण अपघाताला सुरुवात झाली. ताबा सुटलेला ट्रक हा नादुरुस्त ट्रकवर पहिले आदळला. त्यानंतर पाठोपाठ येणार कंटेनर दोघांवर आदळला. त्यानंतर कंटनेरवर एका पाठोपाठ दोन ट्रक आदळले.
लाकडी सीटमुळे चालक-क्लिनर बचावले
नादुरुस्त झालेल्या ट्रकमध्ये लोखंडी पत्रे होते. या ट्रकवर एकापाठोपाठ चार ट्रक आदळले. त्यामुळे ट्रकमधील पत्रे चालकाच्या कॅबीनमध्ये पाठीमागून घुसले. पण, चालकाचे लाकडी सीट भक्कम असल्याने चालक-क्लिनर या भीषण अपघातात बचावले.