नाशिक – राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे नेते महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्काळ राजीनामा द्यावा या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी नाशिक महानगराच्या वतीने रविवार कारंजा येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन जो धक्कादायक खुलासा केला. त्यामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दर महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते. म्हणूनच सचिन वाझे यांची नियुक्ती करावी असा त्यांचा आग्रह होता. असा खुलासा या पत्राव्दारे परमबीर सिंग यांनी केला. या घटनेचा भाजपने अत्यंत तीव्र निषेध केला असून, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासह राज्य सरकार बरखास्त करण्याचे व महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी यावेळी केली आहे.
अब तो ये स्पष्ट है, ठाकरे सरकार भ्रष्ट है….दिलाच पाहिजे… दिलाच पाहिजे… राजीनामा दिलाच पाहिजे….
शिवरायांच्या महाराष्ट्रात खंडणी मागणाऱ्या सरकारचा धिक्कार असो…लागू करा… लागू करा…राष्ट्रपती राजवट लागू करा…. धिक्कार असो… धिक्कार असो… खंडणी पॅटर्नचा धिक्कार असो… अशा जोरदार घोषणा आंदोलन करतेवेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.
या आंदोलनाप्रसंगी भापचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, शहर सरचिटणीस सुनील केदार, महिला आघाडी अध्यक्षा हिमगौरी आडके, सचिव अमित घुगे, संतोष नेरे, ॲड.अजिंक्य साने, प्रदीप पेशकार, प्रा. कुणाल वाघ, सुनील बच्छाव, नंदकुमार देसाई, भास्कर घोडेकर, नीलेश बोरा, अविनाश पाटील, चंद्रशेखर पंचाक्षरी, हेमंत गायकवाड, ज्ञानेश्वर काकड, अमोल इघे, विजय बनछोडे, शिल्पा पारनेरकर, ललिता बिरारी, करुणा गायकवाड, शोभा जाधव, हर्षा फिरोदिया, प्रतीक शुक्ल, वसंत उशीर, नवनाथ ढगे, बबलूसिंह परदेशी, मनीष बागूल, पवन उगले, सुमित नहार, अर्चना दिंडोरकर, गणेश अवनकर, अलका जांभेकर, ऋषिकेश आहेर, कोमल मेहरोलिया, नितीन माळोदे, रुची कुंभारकर, दिगंबर धुमाळ, सोमनाथ बोडके, सुरेश खेताडे, महेश महंकाळे, निखिलेश गांगुर्डे, ऋषिकेश डापसे, ॲड.श्याम घरोटे, शशिकांत शेट्टी, धनंजय पुजारी, अंबादास पगारे, राजेंद्र महाले, प्रसाद धोपावकर, केदार शिंगणे, राजश्री शौचे, रूपाली नेर, रश्मी कुलकर्णी, विलास कारेगावकर, कीर्ती शुक्ल, ऋषिकेश ठाणगावकर, विनायक कस्तुरे, रवींद्र गांगोले, विपुल सुराणा, मनीषा बागूल, विनोद खरोटे, विपूल महेता, गौरव बोडके, मोहन गायधनी, भगवान काकड, जयंत नारद, आबा पवार, स्वाती कुलकर्णी, प्रशांत वाघ, गौतम हिरण, गणेश मोरे, राम ढोबे, रेखा निकम, सुदर्शन काकड, स्मिता मुठे, अशोक गवळी, विशाल पगार, राजनंदिनी आहिरे, विजय मोहिते, रवि भोर, धनंजय माने, गौरव शहाणे, निखिल गांधी, प्रथमेश शिंगणे, डॉ.चेतन जाधव, महेश सदावर्ते आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.