नाशिक – जागतिक महिला दिनानिमित्त श्री साई बहूउददेशीय संस्था, महाराष्ट्र राज्य आयोजित संस्थापक अध्यक्षा सौ. संगिता पाटील यांनी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, क्रिडा, कॄषी, आणि साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलाचा “राष्ट्रीय अहिल्या रत्न पुरस्कारा ” ने सन्मानित करण्यात आले. त्यात उत्कृष्ट गायिका, मॉडेल, अभिनेत्री संज्योती प्रविण देवरे हीला कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय अहिल्यारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराजा मल्हारराव होळकर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज श्रीमंत भुषण सिंह राजे होळकर यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. आजच्या युगात आपली भारतीय संस्कृती आणि परंपरा मात्र टिकवून ठेवावी असे ही प्रतिपादन त्यांनी केले. या कार्यक्रमास डॉ.शेफाली ताई भुजबळ, सहाय्यक पोलिस आयुक्त (CAPF), निलेश माळोसे , इंडिया दर्पणचे साहित्य व संस्कृती विभागाचे संपादक देविदास चौधरी, अभिनेत्री स्मिता प्रभू, डॉ. प्रशांत देवरे, भाऊराव तांबडे, खंडेराव पाटील, नवनाथ ढगे यांची खास उपस्थिती लाभली.