गाडीची काच फोडून चोरट्यांनी केला लॅपटॉप लंपास
नाशिक: भरदुपारी काठेगल्ली परिसरात गाळ्या समोर उभ्या केलेल्या कारच्या दरवाजाच्या काचा फोडून
शनिवारी चोरट्यांनी लॅपटॉप लंपास केला. याप्रकरणी राजेश चंद्रकांत दिक्षीत (काठेगल्ली) यांनी तक्रार दाखल केली आहे.
काठेगल्ली येथील निलयाम अपार्टमेंटच्या गाळ्या समोर दिक्षीत यांनी आपली (एमएच १५, डीएस १५७५)या क्रमांकाची इनोव्हा कार पार्क केली होती. पार्क केलेल्या कारमधून चोरट्यांनी गाडीची पुढील दरवाजाची काच फोडली. त्यानंतर सीटवर ठेवलेल्या बॅगमधून लॅपटॉप चोरून नेला. इतकेच नाही तर चोरट्यांनी गाडीच्या एसी पॅनल व डिजीटल डिस्प्ले उचकटून नुकसान केले. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार भोज करत आहेत.
……….
महिलेच्या गळ्यातील ६० हजार रूपयाची पोत चोरट्यांनी केली लंपास
नाशिक: पाथर्डी फाटा येथे रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील ६० हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी लंपास केली. शनिवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी अश्विनी संदिप दरेकर (रा. ज्ञानेश्वरनगर, पाथर्डीफाटा) यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत दरेकर या आरआरपी विद्यालयासमोरून पाथर्डी फाट्याच्या दिशेने जात असताना समोरून काळ्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील ६० हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत हिसकावून पळ काढल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरिक्षक बाकले करत आहेत.
……
बोलत असतांनाच चोरट्यांनी मोबाईल केला लंपास
नाशिक: बोलता बोलता मोबाईल चोरीला जाणे अशी घटना शरणपुर रोडवरील एमरॉल्ड पार्क हॉटेलसमोर घडली. रस्त्याच्या कडेला मोबाईलवर बोलणार्यांच्या हातातील मोाबईल एका दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी शितल विजय बोरस्ते (हनुमानवाडी, मखमलाबादरोड, पंचवटी) यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करून मोबाईलवर बोलत असतांना पाठीमागून ट्रीपलसीट भरधाव आलेल्या दुचाकीवरील एकाने हातातील १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरिक्षक बैरागी करत आहेत.
……….
दारूला पैसे न दिल्याचा राग, कुटुंबियांनाच केली मारहाण
नाशिक: दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत या रागातून एकाने कुटुंबियांना बेदम मारहाण केल्याची घटना सातपूरच्या श्रमिकनगर परिसरात घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश भिमराव उबाळे (रा. सिद्धीविनायक रो हाऊस, श्रमिकनगर, सातपूर) असे मारहाण करणार्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी कमलेश रामदास जाधव यांनी तक्रार दाखल केली आहे. शुक्रवारी रात्री मद्याच्या नशेत जाधव घरी आले. यावेळी त्याने दारू पिण्यास पैसे दिले नाहीत हा राग मनात धरुन आई व पत्नीला दगडाने बेदम मारहाण केली. अधिक तपास पोलीस नाईक चव्हाण करत आहेत.