शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक – गंगापूररोड भागात मोकळया मैदानात पार्क केलेले सफारी वाहन चोरीला

by Gautam Sancheti
मार्च 26, 2021 | 9:59 am
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


सफारीची चोरी
नाशिक : मोकळया मैदानात पार्क केलेले सफारी वाहन चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गंगापूररोड भागात घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात वाहनचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुंडलिक आनंदराव पाटील (रा.श्रमीक सोसा.मानिकनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पाटील यांची सुमारे साडे तीन लाख रूपये किमतीची सफारी (एमएच ४१ एजे ९६९०) मंगळवारी (दि.२३) रात्री त्यांच्या सोसायटी शेजारील फोकस क्लासेसच्या जवळील मोकळया मैदानात पार्क केलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. अधिक तपास भूमकर करीत आहेत.
………….
दोघा मित्रांना मारहाण
नाशिक : शिवीगाळ करीत असल्याचा जाब विचारल्याने संतप्त दुकलीने दोघा मित्रांना बेदम मारहाण केल्याची घटना शालिमार परिसरात घडली. या मारहाणीत लाकडी बांबूचा वापर करण्यात आल्याने १७ वर्षीय युवक जखमी झाला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर साठे व नावेद उर्फ नाना शेख अशी मारहाण करणा-या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी अमोल गौतम गायकवाड (१७ रा.भिमवाडी,गंजमाळ) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. गायकवाड गेल्या शनिवारी (दि.२०) सायंकाळच्या सुमारास मित्र प्रेम याच्या समवेत शालिमार भागातील संदर्भ सेवा रूग्णालया समोरून पायी जात असतांना ही घटना घडली. वाटेत भेटलेल्या संशयीत दुकलीने कुठलेही कारण नसतांना दोघा मित्रांना शिवीगाळ केली. यावेळी गायकवाड याने जाब विचारला असता एकाने मित्र प्रेम यास लाथाबुक्यांनी तर दुस-याने गायकवाड यास लाकडी बांबूने बेदम मारहाण केली. या घटनेत गायकवाड जखमी झाला असून अधिक तपास पोलीस नाईक गवारे करीत आहेत.

……

उघड्या घरातून रोकडसह मोबाईलची चोरी
नाशिक : तिघे रूम पार्टनर दरवाजा उघडा ठेवून झोपी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी घरात घुसून रोकडसह मोबाईल आणि घड्याळ चोरून नेल्याची घटना जूना गंगापूर नाका भागात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळकृष्ण सुखदेव मिसाळ (२४ रा.वैशाली बिल्डींग,जुना गंगापूर नाका) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बाळकृष्ण मिसाळ गंगापूर नाका भागातील वैशाली बिल्डींगमध्ये पार्टनरशिपमध्ये राहतात. बुधवारी (दि.२४) रात्री तिघे पार्टनर आपल्या रूममध्ये झोपलेले असतांना ही घटना घडली. उकाड्यामुळे तिघे मित्र दरवाजा उघडा करून झोपलेले असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घरात शिरून ही चोरी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी चार मोबाईल,घड्याळ आणि पाकिट असा सुमारे २६ हजाराचा ऐवज चोरून नेला. पाकिटात चार हजार ६०० रूपयांची रोकड होती. अधिक तपास पोलीस नाईक लोंढे करीत आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – सावरकरनगरला तरूणीचा विनयभंग, गुन्हा दाखल

Next Post

दीपाली चव्हाणच्या मारेकऱ्यांना कठोर शासन करा, भाजपाच्या उमा खापरे यांची मागणी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
uma khapare e1616489648143

दीपाली चव्हाणच्या मारेकऱ्यांना कठोर शासन करा, भाजपाच्या उमा खापरे यांची मागणी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011