नाशिक – शहरात महाविकास आघाडीच्या वतीने खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी जय जवान जय किसानची नारेबाजी करत संसरी येथुन शेतकऱ्यांकडून १८ ट्रॅक्टरवर बसुन हा शेतकऱ्यांसाठी अहितकारी असलेला कायदा रद्द करण्याची मागणी करत जय जवान जय किसान ची घोषणाबाजी करण्यात आली .यावेळी खासदार हेमंत गोडसे म्हणाले की, शेतकरी कायद्यामध्ये बदल करत त्यात शेतकऱ्याला कसा फायदा होईल या बाबींचा विचार करून पुन्हा नव्याने कायदा निर्माण करण्यात यावा. या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रतन चावला, संसरीचे सरपंच विनोद गोडसे, उपसरपंच प्रशांत कोकणे, शिवसेना शहरप्रमुख साहेबराव चौधरी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाळासाहेब आडके, काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजीज भाई शेख देवळाली व्यापारी बँकेचे जनसंपर्क संचालक अरुण जाधव, सुरेश कदम, संसरीचे सरपंच विनोद गोडसे, उपसरपंच प्रशांत कोकणे,
अनिल गोडसे, संतोष गोडसे, संतोष कोकणे आदी सहभागी झाले होते.
अनिल गोडसे, संतोष गोडसे, संतोष कोकणे आदी सहभागी झाले होते.