नाशिक – नाशिक शहर व परिसरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये नाशिक महानगरपालिकेच्या वतीने ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व आय.सी.सी.यु बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. २७ मार्च रोजी ५०४ बेडची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामध्ये २९ मार्च रोजी २३५ बेड वाढविण्यात आले आहे. आता एकूण ७३९ बेडची खाजगी रुग्णालयांमध्ये व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ राजेंद्र त्र्यंबके यांनी दिली.