नाशिक – व्दारका परिसरातील खरबंदा पार्क जवळील जानकी प्लाझा या शॅापिंग कॅाम्प्लेक्समध्ये बिल्डर सुनील खोडे यांच्या कार्यालयाला सकाळी ११.३० वाजता आग लागली. अग्निशमन दलाने काही वेळातच ही आग आटोक्यात आणली. धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या वरती हे कार्यालय असल्यामुळे काही काळ गोंधळ उडाला. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. ही आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडत होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. आगीत कार्यालयाच्या फर्निचरचे मोठे नुकसान झाले.