क्रेडीट कार्ड धारकाचे सव्वा दोन लाख लांबविले
नाशिक : क्रेडीट कार्ड अॅक्टीव्ह करण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी परस्पर सव्वा दोन लाख रूपये आॅनलाईन लांबविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिरीवालायम मुरली मोहन (रा.बळी मंदिरासमोर आयोध्यानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मोहन आरबीएल बँकेचे क्रेडिट कार्ड धारक असून १ मार्च रोजी त्यांच्याशी भामट्यांनी संपर्क साधला होता. आरबीएल बँकेतून बोलत असल्याचे सांगून कार्ड अॅक्टीव्ह करण्याचे आमिष दाखविले. यानंतर वारंवार संपर्क साधत क्रेडीट कार्डची गोपनिय माहिती मिळवित भामट्यांनी २ लाख २५ हजार रूपयांचा परस्पर व्यवहार केला. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक श्रीपाद परोपकारी करीत आहेत.
…….