स्वयंपाकासाठी लाकडे आणण्यास नकार दिल्याने मारहाण
नाशिक -स्वयंपाक करण्यासाठी लाकडे आणण्यास नकार दिल्याचा राग आल्याने एकाने एकाला लाकडी काठीने मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना पाईपलाइनरोड परिसरात सोमवारी (दि. २८) सायंकाळी घडली. याप्रकरणी दशरथ पाडुरंग गावडे (वय ३५, रा. पाईपलाइन सिग्नलच्या मोकळ्या मैदानात) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी भावड्या (पूर्ण नाव व पत्ता समजू शकले नाही) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वयंपाक करण्यासाठी संशयित भावड्या याने दशरथ गावडे यास लाकडे आणण्यास सांगितली असता त्याने नकार दिला. त्यातून राग अनावर झाल्याने संशयिताने दशरथ यांना मारहाण व शिवीगाळ केली. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक व्ही. बी. उगले करत आहेत.
……
घरासमोर पार्क केलेली मोटारसायकल लंपास
नाशिक – राहत्या घरासमोर पार्क केलेली मोटारसायकल चोरट्याने चोरून नेल्याची घटना स्वामी सदन अपार्टमेंट, आरटीओजवळ घडली. याप्रकरणी ज्ञानेश्वर सिताराम बिन्नर (वय २५, रा. स्वामी सदन अपा., आरटीओ ऑफिस जवळ, पेठ रोड) यांनी म्हसरुळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिन्नर यांनी त्यांची मोटारसायकल (एमएच १५ सीए १९३८) २४ ऑक्टोबर रोजी घरासमोर पार्क केली होती. त्यांच्या गैरहजेरीत चोरट्याने मोटारसायकल लंपास केले.ए पुढील तपास पोलीस नाईक देसाई करत आहेत.
……
भरधाव ट्रकच्या धडकेत कारचे नुकसान
नाशिक – भरधाव वेगाने ओव्हरटेक करणार्या ट्रकने धडक दिल्याने कारचे नुकसान झाल्याची घटना द्वारका सर्कल परिसरात मंगळवारी (दि. २९) सायंकाळी घडली. याप्रकरणी मयूर नारायण पाटील (वय २७, रा. विनयनगर, चौरंग अपार्टमेंट) याने भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी ट्रक(एमएच ०३ सीपी ९६६१)च्या चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईकडून आग्राच्या दिशेने जाणार्या भरधाव ट्रकने द्वारका सर्कल येथे रॅम्प चढल्यानंतर ओव्हरटेक करण्याच्या नादात कार (एमएच ३९ एबी ६१७९) ला ड्रायवर साईडने जोरदार ठोस मारली. थोड्या अंतरावर पुढे जाऊन ट्रक उभी करून चालकाने पळ काढला. या घटनेत कारचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार एस. पी. दळवी तपास करत आहेत.
…..
दमदाटी करत मोबाईल हिसकावला
नाशिक – दमटाटी करत खिशातून मोबाइल काढून घेतल्याची घटना दिंडोरी नाका परिसरात मंगळवारी (दि. २९) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी आदमसुर इसराइलमिया आलम (वय ६०, रा. वडारवाडी, पेठरोड) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन अनोळखी संशयितांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदमसुर आलम मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दिंंडोरी नाका येथे रस्त्याच्या कडेला भाजीपाला खरेदी करत होते. त्यावेळी दोन संशयित त्यांच्या जवळ आले. त्यांनी आलम यांना दमदाटी करत त्यांचा मोबाइल मागितला. आलम यांनी मोबाइल देण्यास नकार दिला असता एका संशयिताने आलम यांना पकडून ठेवले व दुसर्याने त्यांच्या शर्टच्या खिशातील मोबाइल काढून घेत पळ काढला. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरिक्षक एम. एस. शिंदे करत आहेत.
…..
मटका खेळणारे दोघेजण ताब्यात
नाशिक : मटका खेळत असणार्या दोन संशयितांना भद्रकाली पोलिसांनी मंगळवारी (दि. २९) ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस हवालदार दीपक शिलावट यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी इब्राइम वजिर शेख (वय ५८) व शकील अन्वर खा (वय ५९) या संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या नाशकातील बागवानपुरा येथील अॅक्सिस बॅकेंच्या आडोशाला मटक्याचे आकडे लावले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. त्यावेळी दोघेजण मटक्याचे आकडे लावून अंक आकड्याचा जुगार खेळत असताना आढळून आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस नाईक टी. जी. बाराईत करत आहेत.
…….
शस्त्रबंदीचे उल्लंघन , दोन संशयितांवर शहर गुन्हे
नाशिक : शस्त्रबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणार्या दोन संशयितांवर शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने मंगळवारी (दि. २९) सायंकाळी कारवाई केली. याप्रकरणी पोलीस नाईक विशाल काठे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रसन्न कृष्णा शिंदे (रा. सदगुरु नगर, जेलरोड)व विजय अरुण शिंदे (रा. जेलरोड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी दोीघेजण सराफ बाजार परिसरात फिरत होते. नाशिक शहर पोलीस आयुक्तालय परिसरात सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आली असताना त्यांच्याकडे धारदार कोयता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पुढील तपास पोलीस हवालदार गावित तपास करत आहेत.