राग आल्याने एकास विटा व काठीने मारहाण
नाशिक : घराजवळ फटाके का फोडता, अशी विचारणा केल्याचा राग आल्याने एकास विटा व काठीने मारहाण केल्याची घटना वडाळा रोड, भारतनगर परिसरात सोमवारी (दि. ५) घडली. याप्रकरणी सोहेल कुतुबुद्दीन शेख (वय ३०, रा. यासिन शहा मदरसा जवळ, भारत नगर) याने मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार सुरैय्या, मुस्कान, हुजेब (पुर्ण नाव माहित नाही, रा. यासिन शहा मदरसा जवळ) व मोसिन इसमान बागवान अशी संशयितांची नावे असून त्यांना मंगळवारी (दि. ६) अटक करण्यात आली आहे. फिर्यादी सोहेलने दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवारी रात्री अकरा वाजता संशयित घराजवळ फटाके फोडत होते. त्याचा धूर फिर्यादी सोहेलच्या घरात आल्याने घरातील लोकांना त्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे सोहेलने फटाके का फाडले अशी विचारणा केली. त्याचा राग आल्याने संशयितांनी फिर्यादीस विटा, काठीने बेदम मारहाण केली. तसेच घरात घुसून फिर्यादीच्या बहिणीस देखील शिवीगाळ व मारहाण करत दम दिला. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार एस. पी. क्षिरसागर तपास करत आहेत.
—–
मोटारसायकल चोरीच्या घटना
फिर्यादीनुसार सुरैय्या, मुस्कान, हुजेब (पुर्ण नाव माहित नाही, रा. यासिन शहा मदरसा जवळ) व मोसिन इसमान बागवान अशी संशयितांची नावे असून त्यांना मंगळवारी (दि. ६) अटक करण्यात आली आहे. फिर्यादी सोहेलने दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवारी रात्री अकरा वाजता संशयित घराजवळ फटाके फोडत होते. त्याचा धूर फिर्यादी सोहेलच्या घरात आल्याने घरातील लोकांना त्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे सोहेलने फटाके का फाडले अशी विचारणा केली. त्याचा राग आल्याने संशयितांनी फिर्यादीस विटा, काठीने बेदम मारहाण केली. तसेच घरात घुसून फिर्यादीच्या बहिणीस देखील शिवीगाळ व मारहाण करत दम दिला. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार एस. पी. क्षिरसागर तपास करत आहेत.
—–
मोटारसायकल चोरीच्या घटना
नाशिक : शहरात मोटारसायकल चोरीच्या घटना सुरूच असून विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना दिंडोरी रोड परिसरात घडली. येथील दुकानासमोर उभी केलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी तुषार पुरुषोत्तम रामराजे (वय ३०, रा. एकता नगर, बोरगड) याने म्हसरुळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तुषारने त्याची अॅक्टिव्हा क्र. (एमएच १५ एफझेड ९३३८) सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास दिंडोरी रोडवरील मधूर स्विट समोर उभी केली होती. अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली. दुसरी घटना गंगापूर रोड परिसरात घडली असून चित्रा भास्कर संधान (रा. नर्मदा अपा. शंकरनगर, गंगापूररोड) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अज्ञात चोरट्याने संधान यांची सुझुकी मोपेड कंपनीची मोटारसायकल (एमएच ४८ एच ०७५) पार्किंगमधून चोरून नेली. तिसरी घटना निलगीरी बाग परिसरात घडली असून दत्तात्रय काकाजी शिंदे (रा. निलगीरी बाग) यांनी आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिंदे यांची मोटारसायकल क्र. (एचएम २० सीजी १६३७) अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
—–
अज्ञात व्यक्तीने केली मारहाण
—–
अज्ञात व्यक्तीने केली मारहाण
नाशिक : दारुच्या नशेत असलेल्या एकास अज्ञात व्यक्तीने मारहाण केल्याची घटना वाघाडी नदी पुल, पंचवटी परिसरात घडली. ज्ञानेश्वर लक्ष्मक्ष धुमाळ (वय ३८) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी वनिता धुमाळ यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी एच. पी. सोनवणे तपास करत आहे.
—-
लाथाबुक्यांनी मारहाण, शिवीगाळ व दमबाजी
—-
लाथाबुक्यांनी मारहाण, शिवीगाळ व दमबाजी
नाशिक : लाथाबुक्यांनी मारहाण, शिवीगाळ व दमबाजी केल्याप्रकरणी तिघांविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे. याप्रकरणी मोहम्मद सादिक जाकीर शेख (वय २३, रा, चौक मंडइ, भद्रकाली) याने भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दीपक साळुंखे, किसन साळुंखे, गुलाब साळुंखे (रा. चौक मंडई) अशी संशयितांची नावे आहे. मोहम्मद याने दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवार (दि. ६) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. संशयितांनी त्यास लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली व दम दिला. यावेळी फिर्यादीचा ओरडाओरड ऐकून अजूबाजूचे लोक जमा झाल्याने संशयितांनी पळ काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
——
धारदार शस्त्र व लाकडी दांडक्याने मारहाण
——
धारदार शस्त्र व लाकडी दांडक्याने मारहाण
नाशिक : मागील भांडणाची कुरापत काढत चौघा जणांनी एकास धारदार शस्त्र व लाकडी दांडक्याने मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना पाथर्डी फाटा परिसरात सोमवारी (दि. ५) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पिडित व्यक्तीचा भाऊ सचिन ज्ञानेश्वर सावंत (वय २५, रा. मधूकर नगर, पाथर्डीगाव) याने इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर अजय ज्ञानेश्वर सावंत असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. फिर्यादीनुसार सोनु भवर, अजय दहेकर, सोनु महाजन, बंट्या भुºया (पुर्ण नाव माहित नाही) अशी संशयितांची नावे आहे. मागील भांडणाची कुरापत काढत चारही संशयितांनी अजय यास धारदार शस्त्र व लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात तो जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरिक्षक जे. जी. शेख तपास करत आहे.
—–
चोरट्याने ३२ इंची टीव्ही चोरून नेल्याची घटना
—–
चोरट्याने ३२ इंची टीव्ही चोरून नेल्याची घटना
नाशिक : घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करत अज्ञात चोरट्याने ३२ इंची टीव्ही चोरून नेल्याची घटना जिजामाता नगर, उपनगर परिसरात घडली. याप्रकरणी अमित प्रभाकर घोंगडे (वय ४४, रा. शाहू नगर, बिटको फॅक्ट्री मागे) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घरात कोणी नसताना अज्ञात चोरट्याने कुलुप व कोयंडा तोडून २५ हजार रुपये किंमतीचा टीव्ही चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी हवालदार सोनवणे तपास करत आहे.