नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख १८ हजार १७५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ३ हजार ४४ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार ११४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ८२, चांदवड २३, सिन्नर ६३, दिंडोरी ५३, निफाड ११८, देवळा १२, नांदगांव ९९, येवला २१, त्र्यंबकेश्वर १४, सुरगाणा ०४, पेठ ००, कळवण १६, बागलाण २८, इगतपुरी २१, मालेगांव ग्रामीण ३३ असे एकूण ५८७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २ हजार २३१, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात २०१ तर जिल्ह्याबाहेरील २५ असे एकूण ३ हजार ४४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख २३ हजार ३३३ रुग्ण आढळून आले आहेत.