नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख १७ हजार ३६९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत २ हजार ८५९ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार १०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. नाशिक शहरातील बाधीत रुग्णांच्या संख्या २ हजार ४३ झाली असून ग्रामीण भागात निफाड तालुक्यातील संख्या सर्वाधिक असून ती १११ झाली आहे. दिवसभरात ५२७ नवीन रुग्ण जिल्ह्यात आढळून आले असून २२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर तीन जणांचा मृत्यु झाला आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ८९, चांदवड २४, सिन्नर ७५, दिंडोरी ५०, निफाड १११, देवळा १०, नांदगांव ८७, येवला २९, त्र्यंबकेश्वर १७, सुरगाणा ०६, पेठ ००, कळवण १६, बागलाण २८, इगतपुरी १८, मालेगांव ग्रामीण ४० असे एकूण ६०० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २ हजार ४३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १८८ तर जिल्ह्याबाहेरील २८ असे एकूण २ हजार ८५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख २२ हजार ३२९ रुग्ण आढळून आले आहेत.