नाशिक – शहरासह जिल्ह्यात बुधवारी (२ सप्टेंबर) एकूण ९८२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ९७२ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले तर १७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये आजवरच्या बाधितांची संख्या ३९ हजार १४६ झाली आहे. एकूण मृत्यू ८९४ झाले आहेत. तर ७ हजार १११ जण सध्या उपचार घेत आहेत. आजपर्यंत ३१ हजार १४१ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.
बुधवारी दिवसभरात बाधित झालेल्यांमध्ये नाशिक शहरातील ५९४, ग्रामीण भागातील ३०२, मालेगाव शहरातील ६७ आणि जिल्ह्याबाहेरील ९ जणांचा समावेश आहे.
गेल्या २४ तासात एकूण १७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात नाशिक शहरातील १०, मालेगाव शहरातील १, ग्रामीण भागातील ५ आणि जिल्ह्याबाहेरील १ व्यक्तीचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ७९.५५ एवढी आहे.
नाशिक शहरात आतापर्यंतचे एकूण प्रतिबंधित क्षेत्र १४५३ आहेत. आजवरचे एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या २६ हजार ६७१ झाली आहे. शहरात आतापर्यंत एकूण ५०६ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण २१ हजार ९६७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ४१९८ एवढी आहे.
सध्या उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या अशी
एकूण ७१११
नाशिक शहर ४१९८
नाशिक ग्रामीण २२९३
मालेगाव शहर ६०५
जिल्हाबाह्य १५
तालुकानिहाय संख्या अशी
नाशिक ३८०
बागलाण १९०
चांदवड ५०
देवळा ६८
दिंडोरी ६०
इगतपुरी ६५
कळवण १०
मालेगाव २९०
नांदगाव २६१
निफाड ४१२
पेठ ६
सिन्नर ३९८
सुरगाणा ६
त्र्यंबकेश्वर ३४
येवला ६३