- जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८०.२९ टक्के
- नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ४ हजार ४२८,
- मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ५९१
- ग्रामीण भाग – २ हजार ४२४ पॉझिटीव्ह
- जिल्ह्याबाहेरील – १७
- एकूण – ७ हजार ४६० रुग्ण
- मृत्यु – ९२१ रुग्णांचा मृत्यु
नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३४ हजार १३५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ७ हजार ४६० रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये ३२ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ९२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण: नाशिक ग्रामीण मध्ये
नाशिक – ३४९
चांदवड – ६४
सिन्नर – ३८२
दिंडोरी – ७२
निफाड – ४९६
देवळा – ८५
नांदगांव – २७३
येवला – ८५
त्र्यंबकेश्वर – ४१
सुरगाणा – ०७
पेठ – १२
कळवण – २२
बागलाण – १६१
इगतपुरी – ७०
मालेगांव ग्रामीण – ३०४
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ७३.६७, टक्के, नाशिक शहरात ८३.११ टक्के, मालेगाव मध्ये ७४.६२ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८३.०६ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमा ८०.२९ इतके आहे.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण २६५, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ५१८, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ११४ व जिल्हा बाहेरील २४ अशा एकूण ९२१ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.