नाशिक – शहरासह जिल्ह्यात बुधवारी (२८ ऑक्टोबर) ३३७ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ९२१ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ९२ हजार ७६४ झाली आहे. तर ८६ हजार २२८ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ६६२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ४ हजार ८७४ जण उपचार घेत आहेत.
बुधवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक २६०, ग्रामीण भागातील ७२, मालेगाव शहरातील ३ तर जिल्ह्याबाहेरील २ जणांचा समावेश आहे. तर, ७ मृतांमध्ये नाशिक शहरातील २ आणि ग्रामीण भागातील ५ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६१ हजार ४८०. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ७६२. पूर्णपणे बरे झालेले – ५८ हजार ०४८. एकूण मृत्यू – ८६२. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – २ हजार ५७०. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.४२
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २६ हजार ४७१. पूर्णपणे बरे झालेले – २३ हजार ७४७. एकूण मृत्यू – ५९६.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – २ हजार १२८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८९.७१
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ११४. पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ८५०. एकूण मृत्यू – १६६.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ९८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.५८
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी