नाशिक – शहरासह जिल्ह्यात सोमवारी (३१ ऑगस्ट) एकूण ९०९ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तर, ८९६ जण नवे बाधित झाले आहेत. तसेच दिवसभरात एकूण १० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
सोमवारी दिवसभरात नव्याने बाधित झालेल्यांमध्ये ग्रामीण भागातील १९१, नाशिक शहरातील ६४६, मालेगाव शहरातील ५२ आणि जिल्ह्याबाहेरील ७ जणांचा समावेश आहे. तर, एकूण १० मृत्यूंमध्ये नाशिक शहरातील ५, मालेगाव शहरातील १, ग्रामीण भागातील ४ जणांचा समावेश आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यूंची संख्या ८७२ झाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३७ हजार ३८६ झाली आहे. त्यातील २९ हजार ४२१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या उपचार घेणारे रुग्ण ७ हजार ९३ एवढे आहेत. बरे होणाऱ्यांची टक्केवारी ७८.७० एवढी आहे.
सोमवारचे कोरोना बाधीत-६४६. आतापर्यंतचे प्रतिबंधित क्षेत्र- १२५७. एकूण कोरोना बाधित- २५ हजार ४५१. एकूण मृत्यू – ४९१. घरी सोडलेले रुग्ण – २० हजार ७७३. उपचार घेत असलेले रुग्ण – ४ हजार १८७. सोमवारी मृत्यू झालेल्यांची अधिक माहिती अशी, १) जेलरोड, नाशिकरोड येथील ५५ वर्षीय पुरुष. २) मनमोहन हाईटस, अशोकनगर, नाशिक येथील ९९ वर्षीय वृद्ध पुरुष. ३)चंद्रल हौसिंग सोसायटी, जाधव संकुल, अशोकनगर, सातपूर येथील ७५ वर्षीय वृद्ध पुरुष ४) सातपूर, नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध महिला ५)साई रेसिडेन्सी, तारवाला नगर, पंचवटी नाशिक
उपचार घेत असलेले रुग्ण असे
एकूण ७०९३
नाशिक शहर – ४१८७
मालेगाव शहर ६४०
नाशिक ग्रामीण २२५६
जिल्ह्याबाहेरील १०
तालुकानिहाय संख्या अशी
नाशिक ३८४
बागलाण २१२
चांदवड ५५
देवळा ६९
दिंडोरी ५३
इगतपुरी ६६
कळवण १३
मालेगाव ३०६
नांदगाव २४८
निफाड ३७३
पेठ ६
सिन्नर ३७०
सुरगाणा ६
त्र्यंबकेश्वर १८
येवला ७७