नाशिक – शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी (३ ऑक्टोबर) १ हजार ४३० जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ८५३ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ७८ हजार ४१४ झाली आहे. ६८ हजार ०४५ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ४१० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ८ हजार ९५९ जण उपचार घेत आहेत.
शुक्रवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक ८५१, ग्रामीण भागातील ५५२, मालेगाव शहरातील २० तर जिल्ह्याबाहेरील ७ जणांचा समावेश आहे. तर, १९ मृतांमध्ये नाशिक शहरातील ८, मालेगाव शहरातील २ आणि ग्रामीण भागातील ८, तर जिल्हा बाह्य १ जणाचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ५२ हजार ९७०. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २ हजार २२१२. पूर्णपणे बरे झालेले – ४८ हजार ३४०. एकूण मृत्यू – ७५०. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार ८८०. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९१.२६
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २१ हजार १४५. पूर्णपणे बरे झालेले – १६ हजार ११५. एकूण मृत्यू – ४७३.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४ हजार ५५७. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ७६.२१
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३ हजार ७८१. पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार २१५. एकूण मृत्यू – १५७.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४०९. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८५.०३
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी