नाशिक – शहरासह जिल्ह्यात बुधवारी (१४ ऑक्टोबर) ५८२ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ८४४ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ८७ हजार १९१ झाली आहे. ७८ हजार ०१९ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ५५५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ७ हजार ६१७ जण उपचार घेत आहेत.
बुधवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक ३८१, ग्रामीण भागातील १८४, मालेगाव शहरातील ६ तर जिल्ह्याबाहेरील ११ जणांचा समावेश आहे. तर, ८ मृतांमध्ये नाशिक शहरातील ४ आणि ग्रामीण भागातील ४ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ५८ हजार १७८. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १ हजार १२२. पूर्णपणे बरे झालेले – ५३ हजार ८०२. एकूण मृत्यू – ८२३. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार ५५३. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९२.४८
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २४ हजार ३८२. पूर्णपणे बरे झालेले – २० हजार १८१. एकूण मृत्यू – ५३४.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार ६६७. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८२.७७
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३ हजार ९९५. पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ५६६. एकूण मृत्यू – १६२.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – २६७. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८९.२६
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारीसह सविस्तर वृत्त लवकरच