नाशिक – शहरासह जिल्ह्यात बुधवारी (७ ऑक्टोबर) ९४३ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ८१८ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ८२ हजार ८३८ झाली आहे. ७२ हजार ०७३ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ४७६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ९ हजार २८९ जण उपचार घेत आहेत.
बुधवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक ४७८, ग्रामीण भागातील ४३७, मालेगाव शहरातील २२ तर जिल्ह्याबाहेरील ६ जणांचा समावेश आहे. तर, १३ मृतांमध्ये नाशिक शहरातील ५, मालेगाव शहरातील २ आणि ग्रामीण भागातील ४, तर जिल्हा बाह्य २ जणाचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ५५ हजार ५५५. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १ हजार ६८७. पूर्णपणे बरे झालेले – ५० हजार ४२६. एकूण मृत्यू – ७८८. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४ हजार ३४१. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९०.७७
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २२ हजार ८०८. पूर्णपणे बरे झालेले – १७ हजार ९०५. एकूण मृत्यू – ४९५.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४ हजार ४०८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ७८.०५
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३ हजार ९०४. पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ३२३. एकूण मृत्यू – १६०.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४२१. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८५.१२
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी