नाशिक – शहरासह जिल्ह्यात गुरुवारी (१ ऑक्टोबर) १ हजार १०८ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ८०१ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ७६ हजार ९८४ झाली आहे. ६७ हजार १९२ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ३९१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ८ हजार ४०१ जण उपचार घेत आहेत.
गुरुवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक ६४७, ग्रामीण भागातील ४२३, मालेगाव शहरातील २५ तर जिल्ह्याबाहेरील १३ जणांचा समावेश आहे. तर, २१ मृतांमध्ये नाशिक शहरातील १, मालेगाव शहरातील १ आणि ग्रामीण भागातील १५, तर जिल्हा बाह्य १ जणाचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ५२ हजार ११९. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २ हजार २२१२. पूर्णपणे बरे झालेले – ४७ हजार ७७३. एकूण मृत्यू – ७४२. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार ६०४. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९१.६६
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २० हजार ५९३. पूर्णपणे बरे झालेले – १५ हजार ८९४. एकूण मृत्यू – ४६५.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४ हजार २३४. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ७७.१८
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३ हजार ७६१. पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार १५८. एकूण मृत्यू – १५५.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४४८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८३.९७
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी