नाशिक – शहरासह जिल्ह्यात मंगळवारी (१ सप्टेंबर) ७८८ जण नवे कोरोना बाधित झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच, ७३८ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. दिवसभरात ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना मृत्यूंची संख्या ८७७ झाली आहे. तर, आजवरचे एकूण कोरोना बाधित ३८ हजार १७४ झाले आहेत. यातील ३० हजार १५९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरासह जिल्ह्यात ७ हजार १३८ जण उपचार घेत आहेत.
मंगळवारी बाधित झालेल्यांमध्ये नाशिक शहरातील ६२५, ग्रामीण भागातील १२४, मालेगाव शहरातील ३७ तर जिल्ह्याबाहेरील १ व्यक्तीचा समावेश आहे. तर, गेल्या २४ तासात नाशिक शहरात ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नाशिकमध्ये बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी ७९ एवढी आहे.
सध्या उपचार घेणारे रुग्ण असे
एकूण ७१३८
नाशिक शहर ४३०३
जिल्हा बाह्य ९
मालेगाव शहर ६१२
नाशिक ग्रामीण २२१४
तालुकानिहाय संख्या अशी
नाशिक ३०
बागलाण २१०
चांदवड ५५
देवळा ६९
दिंडोरी ५३
कळवण १०
इगतपुरी ६६
मालेगाव २९०
नांदगाव २४७
निफाड ३८६
पेठ ८
सिन्नर ३६८
सुरगाणा ६
त्र्यंबकेश्वर १९
येवला ७७