नाशिक – शहरासह जिल्ह्यात रविवारी (४ ऑक्टोबर) ८३६ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ७६२ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ८० हजार ११६ झाली आहे. ६९ हजार १७१ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ४३७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ९ हजार ५०८ जण उपचार घेत आहेत.
रविवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक ३९७, ग्रामीण भागातील ४२७, मालेगाव शहरातील ३ तर जिल्ह्याबाहेरील ९ जणांचा समावेश आहे. तर, १० मृतांमध्ये नाशिक शहरातील ५, मालेगाव शहरातील १ आणि ग्रामीण भागातील ४ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ५३ हजार ८१४. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १ हजार ७६१. पूर्णपणे बरे झालेले – ४८ हजार ९९८. एकूण मृत्यू – ७६४. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४ हजार ०५२. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९१.०५
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २१ हजार ९२७. पूर्णपणे बरे झालेले – १६ हजार ५०९. एकूण मृत्यू – ४८४.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४ हजार ९३४. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ७५.२९
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३ हजार ८३४. पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार २६५. एकूण मृत्यू – १५८.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४११. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८५.१६
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी