नाशिक – शहरासह जिल्ह्यात बुधवारी (३० सप्टेंबर) १ हजार २४३ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ७५६ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण २२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ७५ हजार ८७६ झाली आहे. ६६ हजार ३९१ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ३७० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ८ हजार ११५ जण उपचार घेत आहेत.
बुधवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक ७७२, ग्रामीण भागातील ४४४, मालेगाव शहरातील १६ तर जिल्ह्याबाहेरील ११ जणांचा समावेश आहे. तर, २२ मृतांमध्ये नाशिक शहरातील ४, मालेगाव शहरातील २ आणि ग्रामीण भागातील १६ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ५१ हजार ४७२. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २ हजार २२१२. पूर्णपणे बरे झालेले – ४७ हजार २१६. एकूण मृत्यू – ७३८. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार ५१८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९१.७३
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २० हजार १७०. पूर्णपणे बरे झालेले – १५ हजार ७१०. एकूण मृत्यू – ४५०.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४ हजार ०१०. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ७७.८९
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३ हजार ७३६. पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार १०६. एकूण मृत्यू – १५४.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४७६. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८३.१४
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी