नाशिक – शहरासह जिल्ह्यात सोमवारी (१२ ऑक्टोबर) ४९३ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ७३७ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ८६ हजार ००४ झाली आहे. ७६ हजार ९८५ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ५३३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ७ हजार ४८६ जण उपचार घेत आहेत.
सोमवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक २८०, ग्रामीण भागातील १९१, मालेगाव शहरातील ११ तर जिल्ह्याबाहेरील ११ जणांचा समावेश आहे. तर, १० मृतांमध्ये नाशिक शहरातील ६ आणि ग्रामीण भागातील ६ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ५७ हजार ४५८. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १ हजार १५१. पूर्णपणे बरे झालेले – ५३ हजार १०५. एकूण मृत्यू – ८१४. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार ५३९. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९२.४२
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २३ हजार ९४७. पूर्णपणे बरे झालेले – १९ हजार ८९७. एकूण मृत्यू – ५२२.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार ५२८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८३.०९
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३ हजार ९७८. पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ५२२. एकूण मृत्यू – १६१.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – २९५. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८८.५४
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी