नाशिक – शहरासह जिल्ह्यात मंगळवारी (२९ सप्टेंबर) ७४५ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ६५४ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ७४ हजार ६३३ झाली आहे. ६५ हजार ६३५ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ३४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ७ हजार ६५० जण उपचार घेत आहेत.
मंगळवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक ५१४, ग्रामीण भागातील १८५, मालेगाव शहरातील २९ तर जिल्ह्याबाहेरील १७ जणांचा समावेश आहे. तर, १२ मृतांमध्ये नाशिक शहरातील ८, मालेगाव शहरातील १ आणि ग्रामीण भागातील ३ जणाचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ५० हजार ७००. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २ हजार २२१२. पूर्णपणे बरे झालेले – ४६ हजार ६०४. एकूण मृत्यू – ७३४. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार ३६२. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९१.९२
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – १९ हजार ७२६. पूर्णपणे बरे झालेले – १५ हजार ५९२. एकूण मृत्यू – ४३४.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार ७००. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ७९.०४
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३ हजार ७२०. पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ०८९. एकूण मृत्यू – १५२.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४७९. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८३.०४
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी