नाशिक – शहरासह जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात एकूण ६४३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. तर, ६२० नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. गेल्या २४ तासात जिल्ह्यामध्ये एकूण १४ जणांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या २४ तासात ग्रामीण भागात १४८, नाशिक शहरात ४० आणि मालेगाव शहरात २ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर, एकूण १४ मृत्यूंमध्ये नाशिक शहरातील १२ आणि ग्रामीण भागातील २ जणांचा समावेश आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ७९९ झाली आहे. शहरासह जिल्ह्यात आतापर्यंत २५ हजार ३४१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ४ हजार ९१८ जण उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ३१ हजार ५८ एवढी झाली आहे.
नाशिक शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या ९५९ एवढी आहे. शहरात आजवर २० हजार ८१८ कोरोना बाधित झाल्याची नोंद आहे. मंगळवारच्या १२ मृत्यूंसह एकूण मृतांची संख्या ४५४ झाली आहे. आजवर १७ हजार ५७७ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. सध्या शहरात २ हजार ७८७ जण उपचार घेत आहेत.
ग्रामीण भागात सध्या १ हजार ४५४ जण उपचार घेत आहेत. तालुकानिहाय उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अशी,
नाशिक २७२
बागलाण १४३
चांदवड २९
देवळा ४९
दिंडोरी ४६
इगतपुरी ८४
कळवण १३
मालेगाव १६८
नांदगाव ११३
निफाड २६५
पेठ २
सिन्नर २११
सुरगाणा ०
त्र्यंबकेश्वर १३
येवला ४६
मालेगाव शहर ६६८
नाशिक शहर २७८७
जिल्ह्याबाहेरील ९