नाशिक – शहरासह जिल्ह्यात शनिवारी (२४ ऑक्टोबर) २७० जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ६२८ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ९१ हजार ६९१ झाली आहे. ८४ हजार ०४८ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ६३७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ६ हजार ००६ जण उपचार घेत आहेत.
शनिवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १७६, ग्रामीण भागातील ८२, मालेगाव शहरातील १० तर जिल्ह्याबाहेरील २ जणांचा समावेश आहे. तर, ५ मृतांमध्ये नाशिक शहरातील ३ आणि ग्रामीण भागातील २ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६० हजार ७८०. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ८६२. पूर्णपणे बरे झालेले – ५६ हजार ८४८. एकूण मृत्यू – ८५३. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार ०७९. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.५३
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २६ हजार १२३. पूर्णपणे बरे झालेले – २२ हजार ८६०. एकूण मृत्यू – ५८२.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – २ हजार ६८१. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८७.५१
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ०९५. पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ७९५. एकूण मृत्यू – १६५.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १३५. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९२.६७
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी