नाशिक – शहरासह जिल्ह्यात गुरुवारी (१५ ऑक्टोबर) ६९७ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ६२३ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ८७ हजार ८८८ झाली आहे. ७८ हजार ६४२ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ५६४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ७ हजार ६८२ जण उपचार घेत आहेत.
गुरुवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक ३५२, ग्रामीण भागातील ३१९, मालेगाव शहरातील १८ तर जिल्ह्याबाहेरील ८ जणांचा समावेश आहे. तर, ९ मृतांमध्ये नाशिक शहरातील ५ आणि ग्रामीण भागातील ४ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ५८ हजार ५३०. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १ हजार २१२. पूर्णपणे बरे झालेले – ५४ हजार २६७. एकूण मृत्यू – ८२८. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार ४३५. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९२.७२
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २४ हजार ७०१. पूर्णपणे बरे झालेले – २० हजार २८७. एकूण मृत्यू – ५३८.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार ८७६. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८२.१३
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ०१३. पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ६०६. एकूण मृत्यू – १६२.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – २४५. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८९.८६
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी