नाशिक – जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ७२.६६ टक्के, नाशिक शहरात ७६.५१ टक्के, मालेगाव मध्ये ७३.३४ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८३.८७ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७५.४० इतके आहे.
जिल्ह्यात गुरुवारी (१३ ऑगस्ट) दिवसभरात ५७१ जणांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली. तर, शहरासह जिल्ह्यात ६६८ नव्या बाधितांची भर पडली आहे. तसेच, दिवसभरात २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १६ हजार ९५३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ६६८ जणांचा कोरोनामुळे जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. तर, जिल्ह्यात सध्या ४ हजार ८६४ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यात नाशिक शहरात ३ हजार १७७, ग्रामीण भागात १ हजार २९६, मालेगाव शहरात ३८२ आणि जिल्ह्याबाहेरील ९ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या २२ हजार ४८५ एवढी झाली आहे.
जिल्ह्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी
नाशिक – ३४५,
बागलाण – ९३,
चांदवड – ४३,
देवळा ६४,
दिंडोरी – ३९
इतपुरी – ४५
कळवण – ४
मालेगाव – १०३
नांदगाव – १०३
निफाड – २१२
पेठ – ०
सिन्नर – २१५
सुरगाणा – ७
त्र्यंबकेश्वर – १३
येवला – १०