नाशिक – शहरासह जिल्ह्यात बुधवारी (२१ ऑक्टोबर) ५०२ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ५७१ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ९० हजार ५७२ झाली आहे. ८२ हजार ५०८ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ६२४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ६ हजार ४४० जण उपचार घेत आहेत.
बुधवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक २२४, ग्रामीण भागातील २५६, मालेगाव शहरातील १५ तर जिल्ह्याबाहेरील ७ जणांचा समावेश आहे. तर, ११ मृतांमध्ये नाशिक शहरातील ४ आणि ग्रामीण भागातील ७ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६० हजार ०७३. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ८५६. पूर्णपणे बरे झालेले – ५६ हजार ०४४. एकूण मृत्यू – ८४६. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार १८३. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.२९
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २५ हजार ७४९. पूर्णपणे बरे झालेले – २२ हजार १९४. एकूण मृत्यू – ५७७.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – २ हजार ९७८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८६.१९
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ०६६. पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ७५४. एकूण मृत्यू – १६५.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १४७. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९२.३३
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारीसह सविस्तर वृत्त लवकरच