नाशिक – शहरासह जिल्ह्यात मंगळवारी (२० ऑक्टोबर) ४३४ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ५५९ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ९० हजार ०७० झाली आहे. ८१ हजार ९३७ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ६१३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ६ हजार ५२० जण उपचार घेत आहेत.
मंगळवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक ३०८, ग्रामीण भागातील १११, मालेगाव शहरातील १० तर जिल्ह्याबाहेरील ५ जणांचा समावेश आहे. तर, ३ मृतांमध्ये मालेगाव शहरातील १ आणि ग्रामीण भागातील २ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ५९ हजार ८४९. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ८६९. पूर्णपणे बरे झालेले – ५५ हजार ८२२. एकूण मृत्यू – ८४२. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार १८५. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.२७
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २५ हजार ४९३. पूर्णपणे बरे झालेले – २१ हजार ८७३. एकूण मृत्यू – ५७०.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार ०५०. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८५.८०
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ०५१. पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ७३२. एकूण मृत्यू – १६५.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १५४. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९२.१३
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी