नाशिक – नाशिक जिल्ह्यात सोमवारी (१० ऑगस्ट) ५३७ नव्या कोरोना बाधितांची भर पडली आहे. तर, दिवसभरात एकूण २३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकडा ६२० झाला आहे.
नाशिक शहरात सोमवारी दिवसभरात ३३५ जण कोरोना बाधित झाले आहेत. शहरातील एकूण प्रतिबंधित क्षेत्र ११८३ एवढे आहेत. शहरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १३ हजार ८०५ एवढी झाली आहे. सोमवारी दिवसभरात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील एकूण मृत्यूंची संख्या ३५२ झाली आहे. तर, शहरात आतापर्यंत १० हजार ३५२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ३ हजार १०१ जण उपचार घेत आहेत.
नाशिक जिल्ह्यात आजापर्यंत उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या १५ हजार ८२१ एवढी आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४ हजार ६५२ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यात ग्रामीण भागातील १ हजार १९४, मालेगाव शहरातील ३०५ तर जिल्ह्याबाहेरील १० जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २० हजार ५५३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:*
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २९४, चांदवड ३५, सिन्नर २३४, दिंडोरी ५५, निफाड २१०, देवळा ७५, नांदगांव ७०, येवला १०, त्र्यंबकेश्वर ०६, सुरगाणा ११, पेठ ००, कळवण ०४, बागलाण ६०, इगतपुरी ४५, मालेगांव ग्रामीण ८५ असे एकूण ११९४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार १४३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ३०५ तर जिल्ह्याबाहेरील १० असे एकूण ४ हजार ६५२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात २० हजार ५५३ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी*
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ७२.४६, टक्के, नाशिक शहरात ७४.९९ टक्के, मालेगाव मध्ये ७५.५७ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८३.०६ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७४.५० इतके आहे.
नाशिक शहरात यांचे झाले निधन
१) कामटवाडे, नाशिक येथील ६८ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.
२) शिवाजीनगर, सातपूर, नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे
.३)भोई गल्ली,नाशिक येथील ५८ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.
४)नाशिकरोड, नाशिक येथील ६३ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.५) जेलरोड, नाशिक येथील ५० वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.६) दंडगव्हाळ वाडा,सोमवार पेठ, नाशिक येथील ७४ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.७)अजमेरी मज्जिद, नाशिक येथील ७६ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.८)खांदवे सदन, पंचवटी,नाशिक येथील ३५ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.९)अविष्कार अपार्टमेंट, गुरुद्वारा रोड, शिंगाडा तलाव नाशिक येथील ७१ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.१०) संदीप नगर, नाशिक येथील ६० वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.११) कार्बन नाका, नाशिक येथील ६२ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.१२) रुक्मिणी रेसिडेन्सी अंकुर हॉस्पिटल मागे नाशिक येथील ४९ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.१३) गीताश्री अपार्टमेंट,शरणपुर रोड, कॅनडा कॉर्नर येथील ८१ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.१४) पिंपळगाव बहुला,सातपूर, नाशिक येथील ५७ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.१५) शिवानी चौक,नाशिक येथील ५८ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.