नाशिक – शहरासह जिल्ह्यात रविवारी (२३ ऑगस्ट) दिवसभरात ५३० जणांनी कोरोनावर मात केली तर ६७४ जण नवे कोरोनाबाधित झाल्याचे समोर आले. तसेच गेल्या २४ तासात एकूण ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात आजवरच्या बाधितांची संख्या ३० हजाराच्या पुढे गेली आहे.
नाशिक शहरात रविवारी एकूण ३६२ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. शहरात आतापर्यंत १०८९ प्रतिबंधित क्षेत्र आहेत. शहरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या २० हजार ७४ एवढी झाली आहे. रविवारी दिवसभरात ३ जणांचा शहरात कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील एकूण मृतांची संख्या ४२९ झाली आहे. शहरात आतापर्यंत १६ हजार ८९३ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. शहरात सध्या २ हजार ७५२ रुग्ण उपचार घेत आहेत. रविवारी मृत झालेल्यांमध्ये गोकुळ वाटिका, हिरावाडी, पंचवटी येथील ७५ वर्षीय वृध्द महिला, सप्तशृंगी देवी मंदिरा समोर, हनुमान चौक, सिडको येथील ५९ वर्षीय महिला आणि साईबाबा नगर, चौथी स्कीम, सिडको येथील ५९ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
रविवारी कोरोना बाधित झालेल्या नव्या रुग्णांमध्ये ग्रामीण भागातील २४६, मालेगाव शहरातील ६५ तर जिल्ह्याबाहेरील १ जणाचा समावेश आहे. जिल्ह्यात रविवारी दिवसभरात मालेगाव शहरातील २ आणि ग्रामीण भागातील २ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांचा एकूण आकडा ७६८ झाला आहे.
शहरासह जिल्ह्यात आतापर्यंत २४ हजार ३०७ जणांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. सध्या शहरासह जिल्ह्यात ४ हजार ९३४ रुग्ण उपचार घेत आहेत. ग्रामीण भागात एकूण १ हजार ४५८ जण उपचार घेत आहेत. मालेगाव शहरात सध्या ७१४ जण उपचार घेत आहेत. तर जिल्ह्याबाहेरील १० जण सध्या नाशिकमध्ये उपचारार्थ दाखल आहेत. नाशिक मधील एकूण बाधितांची संख्या ३० हजार ९ एवढी झाली आहे.
उपचार घेणाऱ्यांची तालुकानिहाय संख्या अशी,