नाशिक – शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात (१४ व १५ नोव्हेंबर) ४०२ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ५२६ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या ४८ तासात एकूण ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ९७ हजार ०३८ झाली आहे. ९२ हजार ७९३ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ७३० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या २ हजार ५१५ जण उपचार घेत आहेत.
गेल्या दोन दिवसातील नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक २६६, ग्रामीण भागातील १३१, मालेगाव शहरातील ४ तर जिल्ह्याबाहेरील १ जणाचा समावेश आहे. तर, ५ मृतांमध्ये नाशिक शहरातील २ आणि ग्रामीण भागातील ३ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६४ हजार १५०. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ५४३. पूर्णपणे बरे झालेले – ६१ हजार ५९५. एकूण मृत्यू – ८८५. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ६७०. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.०२
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २७ हजार ९०९. पूर्णपणे बरे झालेले – २६ हजार ५६१. एकूण मृत्यू – ६३५.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ७१३. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९५.१७
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार २२३. पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ९३३. एकूण मृत्यू – १७०.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १२०. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.१३
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी