नाशिक – शहरासह जिल्ह्यात सोमवारी (२८ सप्टेंबर) १ हजार ०५७ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ५०१ कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण २२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ७३ हजार ८८८ झाली आहे. ६४ हजार ९८१ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ३३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ७ हजार ५७१ जण उपचार घेत आहेत.
सोमवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक ६८२, ग्रामीण भागातील ३४२, मालेगाव शहरातील २७ तर जिल्ह्याबाहेरील ६ जणांचा समावेश आहे. तर, २२ मृतांमध्ये नाशिक शहरातील १० आणि ग्रामीण भागातील १२ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ५० हजार १८६. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २ हजार २२१२. पूर्णपणे बरे झालेले – ४६ हजार ०९४. एकूण मृत्यू – ७२६. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार ३६६. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९१.८५
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – १९ हजार ५४१. पूर्णपणे बरे झालेले – १५ हजार ४७७. एकूण मृत्यू – ४३१.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार ६३३. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ७९.२०
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३ हजार ६९१. पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ०६५. एकूण मृत्यू – १५१.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४७५. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८३.०४
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी