नाशिक – शहरासह जिल्ह्यात सोमवारी (२९ डिसेंबर) २१६ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ४९७ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख ९ हजार ३३५ झाली आहे. १ लाख ५ हजार ३१४ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ९५५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या २ हजार ०६६ जण उपचार घेत आहेत.
सोमवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १६०, ग्रामीण भागातील ५२, मालेगाव शहरातील २ तर जिल्ह्याबाहेरील २ जणांचा समावेश आहे. तर, ५ मृतांमध्ये नाशिक शहरातील १ ग्रामीण भागातील ४ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ७१ हजार ८१७. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ४९२. पूर्णपणे बरे झालेले – ६९ हजार ५५८. एकूण मृत्यू – ९७०. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार २८९. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.८५
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३१ हजार ९७८. पूर्णपणे बरे झालेले – ३० हजार ६०३. एकूण मृत्यू – ७६२.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ६१३. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९५.७०
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ५४६. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार २२४. एकूण मृत्यू – १७४.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १४८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९२.९२
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी