नाशिक – शहरासह जिल्ह्यात मंगळवारी (१३ ऑक्टोबर) ६०५ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ४८४ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ८६ हजार ६०९ झाली आहे. ७७ हजार ४६९ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ५४७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ७ हजार ५९३ जण उपचार घेत आहेत.
मंगळवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक ३३९, ग्रामीण भागातील २५१, मालेगाव शहरातील ११ तर जिल्ह्याबाहेरील ४ जणांचा समावेश आहे. तर, १४ मृतांमध्ये नाशिक शहरातील ५, मालेगाव शहरातील १ आणि ग्रामीण भागातील ८ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ५७ हजार ७९७. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १ हजार २४७. पूर्णपणे बरे झालेले – ५३ हजार ३९९. एकूण मृत्यू – ८१९. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार ५७९. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९२.३९
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २४ हजार १९८. पूर्णपणे बरे झालेले – २० हजार ०६३. एकूण मृत्यू – ५३०.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार ६०५. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८२.९१
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३ हजार ९८९. पूर्णपणे बरे झालेले – ५ हजार ५४१. एकूण मृत्यू – १६२.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – २८६. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८८.७७
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी