नाशिक – शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी (२४ ऑक्टोबर) ४१९ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ४७७ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ९१ हजार ४२१ झाली आहे. ८३ हजार ४२० जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ६३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ६ हजार ३६९ जण उपचार घेत आहेत.
शुक्रवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक २७१, ग्रामीण भागातील १३८, मालेगाव शहरातील ५ तर जिल्ह्याबाहेरील ५ जणांचा समावेश आहे. तर, ४ मृतांमध्ये नाशिक शहरातील ३ आणि जिल्हा बाह्य १ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६० हजार ६०४. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ८६२. पूर्णपणे बरे झालेले – ५६ हजार ५७०. एकूण मृत्यू – ८५०. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार १८४. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.३४
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २६ हजार ०४१. पूर्णपणे बरे झालेले – २२ हजार ५२८. एकूण मृत्यू – ५८०.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – २ हजार ९३३. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८६.५१
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ०८५. पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ७८२. एकूण मृत्यू – १६५.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १३८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९२.५८
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी