नाशिक – शहरासह जिल्ह्यात गुरुवारी (३१ डिसेंबर) २६६ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ४७६ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख १० हजार ११९ झाली आहे. १ लाख ६ हजार ४७८ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ९६८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या १ हजार ६७३ जण उपचार घेत आहेत.
गुरुवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १६८, ग्रामीण भागातील ७८, मालेगाव शहरातील १५ तर जिल्ह्याबाहेरील ५ जणांचा समावेश आहे. तर, ४ मृतांमध्ये नाशिक शहरातील २ आणि ग्रामीण भागातील २ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ७२ हजार ३५३. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ४६८. पूर्णपणे बरे झालेले – ७० हजार ३४९. एकूण मृत्यू – ९७५. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ०२९. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९७.२३
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३२ हजार १९०. पूर्णपणे बरे झालेले – ३० हजार ९३३. एकूण मृत्यू – ७६९.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४८८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.१०
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ५७०. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार २५४. एकूण मृत्यू – १७५.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १४१. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.०९
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी