नाशिक – शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी (६ नोव्हेंबर) २४९ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ४७३ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ९५ हजार ११० झाली आहे. ९० हजार ४७९ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ६९६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या २ हजार ९३५ जण उपचार घेत आहेत.
शुक्रवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १४७, ग्रामीण भागातील ९१, मालेगाव शहरातील ८ तर जिल्ह्याबाहेरील ३ जणांचा समावेश आहे. तर, ७ मृतांमध्ये नाशिक शहरातील ३, मालेगाव शहरातील १ आणि ग्रामीण भागातील ३ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६२ हजार ९१४. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ६१२. पूर्णपणे बरे झालेले – ५९ हजार ९९८. एकूण मृत्यू – ८७४. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – २ हजार ०४२. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९५.३७
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २७ हजार २९०. पूर्णपणे बरे झालेले – २५ हजार ९१०. एकूण मृत्यू – ६१६.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ७६४. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.९४
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार १८१. पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ८९१. एकूण मृत्यू – १६८.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १२२. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.०६
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी