नाशिक – शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी (१८ डिसेंबर) २७९ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ४६९ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख ६ हजार ५९४ झाली आहे. १ लाख १ हजार ७७६ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ८९८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या २ हजार ९२० जण उपचार घेत आहेत.
शुक्रवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १८१, ग्रामीण भागातील ८८, मालेगाव शहरातील २ तर जिल्ह्याबाहेरील ८ जणांचा समावेश आहे. तर, ४ मृतांमध्ये नाशिक शहरातील १ आणि ग्रामीण भागातील ३ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ७० हजार ०५३. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ६५०. पूर्णपणे बरे झालेले – ६७ हजार १७३. एकूण मृत्यू – ९४८. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ९३२. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९५.८९
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३१ हजार ११८. पूर्णपणे बरे झालेले – २९ हजार ५३०. एकूण मृत्यू – ७३४.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ८५४. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.९०
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ४६९. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार १७१. एकूण मृत्यू – १७२.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १२६. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.३३
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी