नाशिक – शहरासह जिल्ह्यात बुधवारी (३० डिसेंबर) ३६५ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ४५३ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख ९ हजार ८५३ झाली आहे. १ लाख ६ हजार २ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ९६४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या १ हजार ८८७ जण उपचार घेत आहेत.
बुधवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक २७१, ग्रामीण भागातील ८६, मालेगाव शहरातील ५ तर जिल्ह्याबाहेरील ३ जणांचा समावेश आहे. तर, २ मृतांमध्ये नाशिक शहरातील १ आणि ग्रामीण भागातील १ जणाचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ७२ हजार १८५. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ४८२. पूर्णपणे बरे झालेले – ६९ हजार ९९४. एकूण मृत्यू – ९७३. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार २१८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.९६
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३२ हजार ११२. पूर्णपणे बरे झालेले – ३० हजार ८३०. एकूण मृत्यू – ७६७.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ५१५. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.०१
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ५५५. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार २४०. एकूण मृत्यू – १७५.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १४०. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.०८
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी