नाशिक – शहरासह जिल्ह्यात बुधवारी (९ डिसेंबर) ४५२ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर २९९ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख ४ हजार २५१ झाली आहे. ९८ हजार ९७९ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ८४० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ३ हजार ४३२ जण उपचार घेत आहेत.
बुधवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक २६६, ग्रामीण भागातील १६२, मालेगाव शहरातील १३ तर जिल्ह्याबाहेरील ११ जणांचा समावेश आहे. तर, ५ मृतांमध्ये नाशिक शहरातील १ आणि ग्रामीण भागातील ३ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६८ हजार ५७४. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ७१२. पूर्णपणे बरे झालेले – ६५ हजार ६०८. एकूण मृत्यू – ९२२. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – २ हजार ०४४. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९५.६७
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३० हजार ३४५. पूर्णपणे बरे झालेले – २८ हजार ४४१. एकूण मृत्यू – ७०२.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार २०२. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.७३
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ४१२. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार ०९३. एकूण मृत्यू – १७२.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १४७. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९२.७७
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी