नाशिक – शहरासह जिल्ह्यात गुरुवारी (२२ ऑक्टोबर) ४३० जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ४३५ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ९१ हजार ००२ झाली आहे. ८२ हजार ९४३ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ६२८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ६ हजार ४३१ जण उपचार घेत आहेत.
गुरुवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक २६०, ग्रामीण भागातील १५४, मालेगाव शहरातील १४ तर जिल्ह्याबाहेरील २ जणांचा समावेश आहे. तर, ४ मृतांमध्ये नाशिक शहरातील १ आणि ग्रामीण भागातील ३ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६० हजार ३३३. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ८६२. पूर्णपणे बरे झालेले – ५६ हजार २८९. एकूण मृत्यू – ८४७. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार १९७. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.३०
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २५ हजार ९०३. पूर्णपणे बरे झालेले – २२ हजार ३४५. एकूण मृत्यू – ५८०.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – २ हजार ९७८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८६.२६
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ०८०. पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ७७३. एकूण मृत्यू – १६५.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १४२. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९२.४८
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी