नाशिक – नाशिक तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून सातत्याने रुग्णांमध्ये वाढ होत आहे. गेल्या दहा दिवसात १०७१ नवे कोरोना बाधित नाशिक तालुक्यामध्ये आढळले आहेत. तर, शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी (४ डिसेंबर) ४२४ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर २७८ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख २ हजार ५४८ झाली आहे. ९७ हजार ४८९ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ८२० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ३ हजार २३९ जण उपचार घेत आहेत.
शुक्रवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक २६९, ग्रामीण भागातील १४२, मालेगाव शहरातील १० तर जिल्ह्याबाहेरील ३ जणांचा समावेश आहे. तर, ७ मृतांमध्ये नाशिक शहरातील १ आणि ग्रामीण भागातील ६ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६७ हजार ५६७. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ७६७. पूर्णपणे बरे झालेले – ६४ हजार ९०६. एकूण मृत्यू – ९१६. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ७४५. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.०६
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २९ हजार ७४७. पूर्णपणे बरे झालेले – २७ हजार ७२०. एकूण मृत्यू – ६९०.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ३३७. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.१९
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ३६६. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार ०५७. एकूण मृत्यू – १७१.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १३८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९२.९२
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी