नाशिक – शहरासह जिल्ह्यात रविवारी (२० डिसेंबर) ३२४ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ४१७ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख ७ हजार २३३ झाली आहे. १ लाख २ हजार ५५७ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ९०९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या २ हजार ७६७ जण उपचार घेत आहेत.
रविवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात १४९, ग्रामीण भागातील १५८, मालेगाव शहरातील १० तर जिल्ह्याबाहेरील ७ जणांचा समावेश आहे. तर, ५ मृतांमध्ये नाशिक शहरातील ३ आणि ग्रामीण भागातील २ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ७० हजार ४०३. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ६०५. पूर्णपणे बरे झालेले – ६७ हजार ७४१. एकूण मृत्यू – ९५३. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ७०९. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.२२
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३१ हजार ३७९. पूर्णपणे बरे झालेले – २९ हजार ७१५. एकूण मृत्यू – ७३९.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ९२५. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.७०
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ४८९. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार १९१. एकूण मृत्यू – १७२.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १२६. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.३६
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी